रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल यांच्या वतीने पाचगणी नगरपालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणबुट वाटप

पांचगणी(टीम कृष्णकुंज न्युज)समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढे येऊन विद्यार्थ्यांना मदत केल्यास ती अध्यनक्षम होतील .त्यामुळे गुणवत्ता वाढीस लागेल असे प्रतिपादन पाचगणीच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी केले .नगरपालिका शाळा क्रमांक एक व दोन मधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणबुट वाटप कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कऱ्हाडकर बोलत होत्या .कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल या क्लबचे रोट्रीयन स्टेफिन अर्चिक, रोट्रीयन चेतन देसाई,पाचगणी नगरीच्या माजी नगराध्यक्ष सौ लक्ष्मी कऱ्हाडकर तसेच पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री नितीन कासुर्डे व माजी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री भूषण बोधे तसेच रोट्रेक्ट क्लब पाचगणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे यांनी सूत्रसंचालन श्रीकृष्ण कापसे व पाहुण्यांचे आभार माननीय श्री. रमजान सय्यद यांनी मानले.रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रल यांच्या सौजन्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरपालिका शाळा क्रमांक एक व शाळा क्रमांक दोन यामधील 400 विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठी गन बूट वाटप करण्यात आले गेल्या वर्षी याच क्लब कडून सर्व मुलांना रेनकोटचे वाटप करण्यात आली होते.
