मेढा

डॉल्बी मालकांनी परवानगी घेणे बंधनकारक; अन्यथा कारवाई – सपोनि सुधीर पाटील

गणेश उत्सव काळात स्पिकर , डॉब्ली मालकांना सुचना करताना सपोनि सुधीर पाटील (सोमनाथ साखरे )

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज येथील)संपूर्ण गणेश उत्सव काळात तालुक्यातील व बाहेरून येणाऱ्या स्पीकर व डॉल्बी डीजे मालकांनी तसेच गणेश उत्सव मंडळांनी स्पिकर परवानगी व्यतिरिक्त पोलिसांची डॉल्बीसाठी स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक असून विनापरवाना व मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी डीजे वाजवल्यास व तक्रार आल्यास डॉल्बी मालकावर गुन्हे दाखल करून डॉल्बी मशीन व संबंधित वाहन जप्त केले जाईल, असा इशारा मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर पाटील यांनी दिला आहे.
गणेश उत्सव (दि. २७ ) पासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील स्पीकर, डॉल्बी व डीजे मालकांची गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेढा पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत सपोनि पाटील बोलत होते. ते म्हणाले गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेतलेली असली तरी गणेशोत्सव काळात डॉल्बी डीजे मालकांनी स्वतंत्ररीत्या पोलीस ठाण्याची परवानगी काढणे बंधनकारक असून पोलीस ठाण्यात असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावयाचा आहे. जे डॉल्बी डीजे मालक असा परवाना घेणार नाहीत व मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे डॉल्बी वाजवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. संबंधितांवर गुन्हे दाखल करून डीजे डॉल्बी मशीन व वाहन जप्त करून कारवाई केले जाईल. बाहेरच्या डीजे डॉल्बी धारकांनी जावली तालुक्यात डीजे डॉल्बी वाजवायचा असेल तर त्यांनीही परवानगी काढणे बंधनकारक आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बी डीजे ठरवतानाच संबंधिताला परवानगी घेण्याबाबत सांगावे.
गणेशोत्सवातील मिरवणुकीत ए वाजव रे मी बघतो कोण काय करतो ते अशा पद्धतीने कार्यकर्ते डॉल्बी मालकाला आवाज वाढवण्यासाठी सक्ती करतात. मात्र, नंतरच्या कारवाईला संबंधित डॉल्बी मालकालाच तोंड द्यावे लागते. गणेशोत्सव काळात साऊंड लेवल मशीन द्वारे आवाजाची मर्यादा तपासली जाणार असून सुप्रीम कोर्ट , हायकोर्ट यांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे डॉल्बी वाजवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा सपोनि पाटील यांनी बैठकीत दिला. तेजस गंगावणे, गणेश नरुळे, जगन्नाथ जाधव, शिवाजी धनावडे, उमेश बांदल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button