मेढा

जावलीचा विकास करणाऱ्या बाबा राजेंच्या नेतृत्वावर वसंतराव मानकुमरेंचा विश्वास नाही का ? – संदिप पवार

महु हातगेघर कॅनॉलचे काम दोन टक्केच शिल्लक पाणी येणार म्हणून जलसमाधीचा ढोंगीपणा - धरण ग्रस्त शेतकरी

वसंतराव मानकुमरे यांच्या अंदोलनावर बोलताना संदीप पवार, श्रीरंग गलगले, प्रकाश परामणे आदी धरणग्रस्त शेतकरी ( सोमनाथ साखरे )
वसंतराव मानकुमरे यांच्या अंदोलनावर बोलताना संदीप पवार, श्रीरंग गलगले, प्रकाश परामणे आदी धरणग्रस्त शेतकरी ( सोमनाथ साखरे )

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)- जावली तालुक्यात मंत्री महोदय बाबा राजेंच्या माध्यमातुन विकास कामे सुरु आहेत. बाबा राजेंचा अत्यंत कार्यकुशल मंत्री म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधिश गौरव करत असताना वसंतराव मानकुमरेंचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का ? मानकुमरेंचे अंदोलन म्हणजे कार्य कुशल नेतृत्वाला अडचणीत आणण्याचे आहेत का ? असे प्रश्न उपस्थित करीत वसंतभाऊ मात्र सत्ताधाऱ्यांच्या छायेत सुखाने घोटाळे आणि सत्तेचा मेवा उपभोगत राहीले अशी टिका शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप पवार यांनी केली.
ते पुढे म्हणले येणाऱ्या संभाव्य निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी महुहातगेघर धरणाचा प्रश्न निर्माण करून सणासुधीत अंदोलन करून जल समाधी घेणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांनी जलसमाधीचे ढोंग थांबवून सरळ राजकीय संन्यास घ्यावा असा सल्ला देत मह हातगेघर धरणाच्या कॅनॉलचे काम दोन टक्के शिल्लक असून येत्या एक महिन्यात शेतकऱ्याच्या शेतात कॅनलद्वारे पाणी पोहचणार असल्याचे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संदिप पवार यांनी माहिती दिली.
पंचवीस वर्ष धरणग्रस्तांवर राजकारण करून प्रश्न सोडवता आला नाही. ज्यांच्या जमिनी विकायच्या आहेत त्यांच्या वाटपाचे आदेश प्रशासनातुन कसे निघत होते आणि फलटण तालुक्यात मिळालेल्या जमिनी विकूण मलिदा खान्यात कोणाचा सहभाग होता हे जनतेला माहीत आहे असेही संदिप पवार यांनी सांगितले.
यावेळी रामवाडीचे सरपंच श्रीरंग गलगले म्हणाले कालवा कृती समितीच्या माध्यमातुन गत २०१४ पासून शेतकऱ्याच्या शेतात पाणी यावे म्हणून प्रयत्न सुरू होते. धरणाचा डावा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसामुळे ट्राय घेण्याचे थांबले आहे. दसऱ्याच्या आत पाणी कॅनॉल द्वारे धावणार आहे हे समजल्याने आता कृती समिती स्थापन करून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वसंतराव मानकुमरे व त्यांचे सहकारी यांची नावे न घेता गलगलेंनी टिका केली.
यावेळी प्रकाश परामणे म्हणाले आम्ही तर शासनाकडे अशी मागणी करतो की, ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी यावे म्हणून प्रयत्न केले नाहीत अशा नेत्यांची जावली तालुक्याला गरज आहे तेव्हा त्यांनी जलसमाधी घेण्याआधी धरणाचे पाणी सोडून धरण कोरडे करावे कारण असे नेते राहिले पाहिजेत अशी खोचक टिका केली.
महेश कदम यांनी तीस वर्षात कुठल्या नेत्याला शेतकऱ्यांचे प्रश्न दिसले नाहीत का? दोन तीन पायपा जोडायच्या राहिल्यात हे दिसल्यावर श्रेय घेण्यासाठी कृती समिती स्थापन करून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे श्रेय फुकटात घेवुन नारळ फोडणारांची घाई झालीय का? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी तालुकाध्यक्ष समिर गोळे, शांताराम पार्टे, सरपंच श्रीरंग गलगले, महेद्र सपकाळ, संजय सुर्वे, प्रकाश परामणे, राजेश माने, दत्तात्रय पोफळे, दिपक शिंदे, सतिश पवार, अशोक परामणे, विक्रम तरडे, अमरदीप तरडे, महेश कदम, बाबु पवार, सचिन करंजेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button