पांचगणी

पहलगाम पर्यटक हल्ला ; पाचगणीत कॅन्डल मार्च, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणांनी पर्यटन स्थळ दणाणले

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्ह आज सायंकाळी पांचगणी शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चा व कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद… च्या घोषणांनी पर्यटन स्थळ दणाणून गेले.
पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. अनेक पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यानंतर अख्खा देश संतप्त झाला. सर्वत्र निषेध मोर्चे होत असताना पांचगणी या पर्यटन स्थळावरील सर्व धर्मीय एकत्र आले आणि आज हजारोंच्या संख्येने उपस्थितीत भव्य असा बस स्थानकापासून मोर्चा काढला, यामध्ये प्रत्येकाच्या हातात प्रज्वलित केलेली
कॅन्डल होती. यामध्ये शालेय मुले, सर्वधर्मीय लोक सहभागी झाल्याने या निषेध रॅलिने वेगळीच उंची गाठली. यावेळी भारत माता की जय…हिंदुस्थान झिंदाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देण्यात येत होत्या.
हा कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर या ठिकाणी निषेधाबरोबरच सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करीत अशा देशविघातक प्रवृत्तींना ठेचून काढा अशा भावना व्यक्त करण्यात येत होत्या.
या रॅलीत शहरातील सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते.

पांचगणी हे जगातील दर्जाचे पर्यटन स्थळ असून सर्वधर्मीयांचे वास्तव्याचे शहर आहे. त्यामुळे या शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिचन, भोरी मुस्लिम, बौद्ध,पारशी, अशा विविध जाती धर्माचे लोक या रॅलीत सहभागी झाले. तर या सर्व धर्मियांनी आप आपल्या धर्मांच्या प्रार्थना म्हणून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले तर या हल्ल्यातील जखमींना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button