पांचगणी

कासवंड गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोलशेठ चोरमले यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

पाचगणी(टीम कृष्णकुंज न्युज) महाबळेश्वर तालुक्यातील पासून गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोलशेठ चोरमले यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षपदी नुकतेच निवड करण्यात आली आहे याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात असून महाबळेश्वर तालुक्यात पक्ष वाढी बरोबरच संपूर्ण सातारा जिल्हा भाजप मे करण्याच्या दृष्टिकोनातून महाबळेश्वर तालुक्यातील तळागाळापर्यंत भाजप पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावचे सुपुत्र अमोल शेठ चोरमले या युवा नेतृत्वाला भाजपच्या वरिष्ठ पत्र होऊन संधी देण्यात आली असल्याचे समजते भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सातारा राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. अमोल चोरमले हे महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे त्याचबरोबर वाई ,जावळी तालुक्यात जिल्ह्यातील युवक वर्गामध्ये अमोल चोरमले यांचा व्यक्तिगत पातळीवर मोठा जनसंपर्क असल्याने भाजप पक्षाला अमोल चोरमले यांच्यासारखा युवा नेतृत्वाची मोठ्या प्रमाणात पक्ष वाढीसाठी मदत होणार आहे या पदाचा माध्यमातून अनेक सामाजिक कामाला हात घालणारे व समाजासाठी झटणारे अमोल चोरमले यांना खऱ्या अर्थाने भाजप पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी मिळाली आहेत पक्ष आपल्यावर जी जबाबदारी टाकली ती आपण प्रामाणिकपणे पार पाडणारा असून मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवू अशा विश्वास अमोल चोरमले यांनी व्यक्त केला
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे अमोल चोरमले यांनी खेचून आणले आहेत त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात अमोल यांच्या माध्यमातून एक युवा चेहरा मिळाला आहे .त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाबळेश्वर तालुक्यातील सर्व स्थरातून त्यांच्या अभिनंदन होत आहे.तसेच महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी देखील अमोल चोरमले यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button