गुरेघर येथील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने केले जमीनदोस्त ; पहाटेपासून मोहीम, मेट गुताड आणि महाबळेश्वर येथील ही बांधकामावर हातोडा पडणार

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज): महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम महसूल विभागाने पुन्हा जलद गतीने सुरू केली असून आज गुरेघर येथील ऐका अनधिकृत बांधकामावर लक्ष केल्याने एकच खळबळ उडाली.
आज तालुक्यातील तीन ठिकाणावरील बांधकामे पाडण्याला पहाटेपासून सुरुवात झाली आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सर्व यंत्रणा गुरेघर येथे तयार होती. या ठिकाणावरील प्राची नागपूरवाला यांच्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाने हातोडा मारला आणि सर्व बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यास सुरुवात केली आहे.
याबरोबरच मेटगुताड आणि महाबळेश्वर अशा तीन ठिकाणावरील बांधकामे आज जमिन दोस्त केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या अगोदर दोन महिन्यापूर्वी भिलार ,भोसे ,खिंगर येथील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाने व जिल्हा प्रशासनाने हातोडा मारून सर्व बांधकामं जमीन दोस्त केली होती. काही उसंती नंतर आज पुन्हा ही मोहीम महसूल विभागाने अचानक रविवार असूनही सुरू केली. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
