परवान्यांवरील शस्त्र सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगणे, प्रदर्शन व वापरास १७ मे पर्यन्त मनाई

सातारा (टीम कृष्णकुंज न्यूज): लोकसभा निवडणूक कार्यक्रम प्रसिध्दीच्या दिनांकापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू केलेली असल्याने लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रियासौहार्द, शांततेत व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पाडणेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम144 मधील तरतुदीनुसार शस्त्र परवाना धारक यांना त्यांचे शस्त्र परवान्यांवरील शस्त्र सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगणेस, प्रदर्शन करणेस, व वापर करणेस सदर आदेशाच्या दिनांकापासूनते दिनांक १७ मे २०२४ रोजी पर्यन्त मनाई केली आहे. यामधुन खालील बाबी वगळण्यात येत आहेत.बैंक, कारखाने, न्यायालय व इतर आस्थापना यांचे सुरक्षेसाठी निर्गमित केलेल्या शस्त्र परवान्यावरील शस्त्रे.
नेमबाजी प्रयोजनार्थ निर्गमित झालेले शस्त्र परवान्यावरील शस्त्रे, शस्त्र खरेदी-विक्री करणारेआस्थापना, शस्त्र प्रदर्शित करणारे परवानाधारक यांचेकडील शस्त्रे या बाबी वगळण्यात येत आहे.


