भिलार

एंजल विंग्स स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन हे पुस्तकाच्या गावाला गौरव व अभिमानाची गोष्ट -अभिनेत्री गौरी इंगवले

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज)
शाळेची वास्तू ही विध्यार्थी मध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करत असते त्यामूळे शाळेत चांगले विध्यार्थी घडत असतात त्याच बरोबर शिक्षकांनमध्ये पण ऊर्जा निर्माण होत असते .त्यामुळेच चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन चांगले विध्यार्थी घडत असतात एंजल विंग्स स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन हे पुस्तकाच्या गावात एक गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे आता या शाळेपासून गावाला चांगली व वेगळी अपेक्षा आहे आणि ही शाळा त्यासाठी प्रयत्न शील राहिल या शाळेतुन चांगले विदयार्थी घडवून आपले वेगळेपण समाजाला दाखवेल अशी अपेक्षा यावेळी गौरी इंगवले यांनी बोलून दाखवली
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन सिने अभिनेत्री गौरी इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना अभिनेत्री गौरी हिने विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना शालेय व्यासपीठावर आपल्याच घरच्या लोकांच्या समोर सादर करावे म्हणजे स्टेज डेरिंग वाढेल. पुढे विविध क्षेत्रात जाण्याचे धाडस निर्माण होईल..
प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याचे काम शालेय इमारत करते. म्हणून इमारत वास्तू आकर्षक सुंदर असल्यास शालेय आवारात पाऊल ठेवताच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनात शिक्षणाप्रती अनोखी ऊर्जा निर्माण होते. त्याचे परिवर्तन शैक्षणिक प्रगतीत दिसते. असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी केले.
भिलार, तालुका महाबळेश्वर येथील निलेश भिलारे एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट संचलित एंजल विंग्स प्री प्रायमरी स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी नितीन पाटील ( काका ) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेत्री गौरी इंगवले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पाचगणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, बाजार समिती सदस्य राजेंद्र भिलारे, शिवसेना युवाने नितीन भिलारे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली भिलारे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे, रुपेश बगाडे, निखिल भिलारे, निलेश भिलारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश खांडके, एंजल विंग्स स्कूल संस्थापिका अध्यक्ष निशिता खांडके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र राजपुरे आणि शेखर कासुर्डे यांनी सुद्धा आपले विचार मांडले आणि शालेय व्यवस्थापनाला पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या आहेत..
एंजल विंग्स स्कूल संस्थापिका अध्यक्ष निशिता खांडके यांनी स्कूलच्या स्थापनेच्या १४ वर्षातील अनुभवांचा आणि प्रगतीचा आलेख मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार व पुरुषोत्तम माने यांनी केले तर शेवट आभार संस्थेचे अध्यक्ष महेश खांडके यांनी मानले..
कार्यक्रमास विद्यार्थी पालक निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button