केळघर.ता.जावली येथील उपसरपंचपदी शंकर बेलोशे यांची बिनविरोध निवड

केळघर(टीम कृष्णकुंज न्यूज). केळघर.ता.जावली येथील उपसरपंच पदाचा एक वर्षांचा कार्यकाल समाप्त झाल्याने सागर पार्टे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाला उपसरपंच म्हणून निवडण्यासाठी आज ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावून रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक तात्काळ घेणेत आली.उपसरपंच पदासाठी एकच अर्ज असल्याने उपसरपंच पदी शंकर गणपत बेलोशे यांची सरपंच सविता बेलोशे,ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ बेलोशे, हिराबाई भिलारे,सागर पार्टे,आशा चव्हाण,दिपाली बेलोशे, यांच्या उपस्थितीत बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे व ग्रामसेवक शिवाजी निर्मल यांनी काम पाहिले.
निवडीनंतर फटाक्यांची अतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली.उपसरपंच शंकर गणपत बेलोशे यांना ग्रामस्थ राजकिय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. सरपंच बबनराव बेलोशे, मा. उपसरपंच सुनील नाना जांभळे, मा.उपसरपंच सचिन बिरामणे, युवराज धुमाळ, बाजीराव पार्टे, शंकर , बाळासाहेब कडव, सुनिल बेलोशे, सुनिल बिरामणे, सतिश बेलोशे, शैलेश पार्टे दिपक शिंदे उपस्थित होते.