पांचगणीसामाजिक

आय लव पांचगणी फेस्टिवल 1डिसेंबर अखेर

पांचगणी (टी कृष्णकुंज न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या २७ तारखे ( शुक्रवार ) पासू १ डिसेंबर अखेर होणारा आय लव्ह पांचगणी फेस्टिवल पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती संयोजकांनी दिली . तारिख पुढील आठवड्यात निश्चित करण्यात येणार आहे .
बंधुत्व, मैत्री आणि जिव्हाळा असा त्रिवेणी संगम एकत्र करून पांचगणीतील सर्व घटकांना एका छताखाली घेऊन गेली आठ वर्ष साजरा होणारा आय लव्ह पांचगणी फेस्टिवल सोहळा म्हणजे स्थानिकांना व्यवसायाची संधी देण्याबरोबरच पर्यटनाला चालना देणारा तसेच पांचगणीचा व राज्याचा नावलौकिक वाढविण्यात यशवीरित्यापार पडत असल्याने राज्य शासनाने राज्यातील पर्यटन मोहत्सवाच्या यादीत या फेस्टिवलला स्थान दिल्याने या सोहळ्याला उंच टप्पा मिळाला असून पर्यटकांबरोबरच जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध ठिकाणचे नागरिक मोठया संख्येने या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावत आहेत . दरवर्षी डिसेंबर महिन्यातील पहिला रविवार समाविष्ट करून या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते , त्या अनुषंगाने यावर्षी २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर अखेर या सोहळ्याची आखणी करण्यात आली . फेस्टिवल दरम्यान होणाऱ्या कला, क्रीडा , व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले ..ठिक ठिकाणी भल्या मोठ्या होर्डिंग लावण्यात आल्या , विविध माध्यमातून फेस्टिवलचा प्रसारही झाला . यावर्षीच्या फेस्टिवल मध्ये इतर कळविष्कारांबरोबरच युथ फेस्टिवल समाविष्ट करण्यात येणार असल्याने शहरी भागातील विविध कॉलेजचे युवा युवती मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत , तसेच अम्युझमेंट गेम्सचा समावेश करण्यात येणार असल्याने यावर्षीचा सोहळा संजीवन विद्यालयाच्या ग्राउंडवर घेण्याचे ठरले आहे तसेच खाऊगल्ली व इतर स्टॉलची संख्या वाढविण्यात आली आहे .राज्यातील निवडणकांची रणधुमाळी नुकतीच संपली असली तरी आचारसंहिता २७ तारखेला संपणार असल्याने त्यातच फेस्टिवल करिता दाखल होणारी मंडळी तसेच युवा मोहत्सवात विविध कॉलेजच्या युवा युवतींचा सहभाग मोठ्या संख्येने होणार असल्याने निवडणुकीचे वातावरण पूर्णतः निवळल्याने नसल्याच्या पार्श्वभूमीवर फेस्टिवल पुढे घेण्यात येणार असल्या बाबतचा निर्णय फेस्टिवल समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती फेस्टिवल कमिटीचे संयोजकांनी यांनी दिली . फेस्टिव्हलची तारिख काही दिवसात निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button