पांचगणी

पाचगणी पोलीस ठाण्याला ‘सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत ‘पुरस्काराचा बहुमान;

जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांचेकडून पाचगणी पोलिसांचा गौरव

पांचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज)पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व टीमला चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत सर्वोत्कृष्ट पुरस्कार पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आंचल  दलाल,वाई उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पांचगणी पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या दाखल गुन्हयांपैकी अनेक गुन्हे सपोनि.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण टीम, बीट अंमलदार यांनी उघडकीस आणले. त्यात लंपास केलेली मालमत्ता हस्तगत केली. त्यातील काही मालमत्ता न्यायालयीन प्रक्रियेनंतर तक्रारदारांच्या स्वाधीनही केली. अनेक चोरीच्या गुन्ह्याचा चोख तपास करून त्यात चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आघाडी घेत संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस नाईक श्रीकांत कांबळे, तानाजी शिंदे, पोलिस काॅ.उमेश लोखंडे यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button