भिलार

भूतेघर व भिलार वन परिसरात वन विभागाची वन्य जीव शिरगणना.. बुद्ध पौर्णिमा मोहीम:भेकर सांबरासहित रानगवे निदर्शनास.

भिलार (टीम कृष्णकुंज) गुरेघर अवकाळी तालुका महाबळेश्वर वन परिमंडळ क्षेत्रांतर्गत भिलार व भुतेघर वन विभागात बुद्धपौर्णिमा या रात्री वन्य प्राणी जन गणना करण्यात आली यामध्ये वन विभागाला सांबर, रानगवे, अन्य प्राण्याचे  दर्शन घडले आहे.

प्रत्येक वर्षी वनविभाग बुद्धपौर्णिमा च्या रात्री वन्य जीव प्राणी जनगणना मोहीम राबविली जाते, या वर्षी बुध्दपौर्णिमा चांदण्या रात्री गूरेघर अवकाळी वन परिमंडळ क्षेत्रांतर्गत भिलार व भुतेघर वन विभागात वन्य जीव प्राणी जनगणना करण्यात आली. यामध्ये भिलार, व भुतेघर वन क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या  मचान वरून निगराणी करीत रात्री वन्यजीव प्राणी जन गणना करण्यात आली. यामध्ये  भेकर, सांबर, ससे, रानगवे, शेकरू, लंगुर, निदर्शनास आले.

या मोहिमेमध्ये र. व्यं.काकडे वन परिमंडळ अधिकारी गुरेघर, वैभव अशोक शिंदे वनरक्षक गुरेघर, 

संजय श्रीपती भिलारे, वनसेवक गुरेघर, साहेबराव पारटे, अनिकेत सपकाळ, आदींनी सहभाग घेतला होता. भिलार (टीम कृष्णकुंज) गुरेघर अवकाळी तालुका महाबळेश्वर वन परिमंडळ क्षेत्रांतर्गत भिलार व भुतेघर वन विभागात बुद्धपौर्णिमा या रात्री वन्य प्राणी जन गणना करण्यात आली यामध्ये वन विभागाला सांबर, रानगवे, अन्य प्राण्याचे दर्शन घडले आहे.
प्रत्येक वर्षी वनविभाग बुद्धपौर्णिमा च्या रात्री वन्य जीव प्राणी जनगणना मोहीम राबविली जाते, या वर्षी बुध्दपौर्णिमा चांदण्या रात्री गूरेघर अवकाळी वन परिमंडळ क्षेत्रांतर्गत भिलार व भुतेघर वन विभागात वन्य जीव प्राणी जनगणना करण्यात आली. यामध्ये भिलार, व भुतेघर वन क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या मचान वरून निगराणी करीत रात्री वन्यजीव प्राणी जन गणना करण्यात आली. यामध्ये भेकर, सांबर, ससे, रानगवे, शेकरू, लंगुर, निदर्शनास आले.
या मोहिमेमध्ये र. व्यं.काकडे वन परिमंडळ अधिकारी गुरेघर, वैभव अशोक शिंदे वनरक्षक गुरेघर,
संजय श्रीपती भिलारे, वनसेवक गुरेघर, साहेबराव पारटे, अनिकेत सपकाळ, आदींनी सहभाग घेतला होता. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button