भिलार

भिलार गावात ‘महाराजीव अभियान’ अंतर्गत शेत रस्ते आणि शेतीच्या वादांवर तोडगा

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)भिलार (ता. महाबळेश्वर) :
‘महाराजीव अभियान’ अंतर्गत भिलार येथे ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीदरम्यान गावातील पाणंद रस्ते, शोधमोहीम सर्वेक्षण तसेच शेतरस्त्यांची पाहणी करून उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांचे सहमतीपत्र घेणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, मोजणी व सीमांकनातील त्रुटी दूर करणे, तसेच शेतीसंबंधी वाद समोपचाराने मिटविण्यावर भर देण्यात आला. नकाशावर नोंद नसले तरी गावच्या प्रत्यक्ष वहिवाटीतील रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला.
यावेळी सरपंच शिवाजीराव भिलारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे आबा, गणपत पारठे, अमोल भिलारे, जयवंत भिलारे, अशोक भिलारे, अरुण भिलारे, शिवाजी भिलारे, प्रकाश भिलारे, सुभाष भिलारे, सुरज भिलारे, उमेश भिलारे, प्रकाश गावडे, रोहन भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच ग्राम महसूल अधिकारी एस. के. पवार, ग्रामपंचायत अधिकारी आर. व्ही. चव्हाण, पोलीस पाटील रुपाली कांबळे, महसूल सेवक प्रशांत कांबळे आणि गावातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे गावातील शेतीविषयक समस्या सोडविण्यास तसेच शेतकऱ्यांना रस्त्यांची सुविधा मिळवून देण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button