भिलार
दानवली ग्रामसभेत शाहिर आनंदा दानवले यांचे सामाजिक प्रबोधन

भिलार: (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)दानवली येथील विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत माऊली सामाजिक संस्थेच्या वतीने शाहिर आनंदा दानवले यांनी सामाजिक प्रबोधन केले. यावेळी त्यांनी आपल्या खास शाहिरी शैलीत वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, मुलांचे आरोग्य आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन केले.

या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान राजेंद्र राजपुरे यांनी भूषवले. प्रवीण भिलारे (जिल्हा नियोजन समिती सदस्य), गट विकास अधिकारी, ग्रामसेवक बाबर मॅडम, पोलीस पाटील, पोलीस बिट अंमलदार, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाहिर दानवले यांनी सामाजिक विषयांवर प्रभावीपणे भाष्य करून उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यांचे हे प्रबोधन गावातील नागरिकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरले.
