भिलार
महाबळेश्वर परिसरात मुसळधार पावसामुळे भिलार शाळेच्या कार्यालयाचा स्लॅब कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही


भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भिलार येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुख कार्यालयाचा स्लॅब आणि भिंत कोसळली. सुदैवाने, ही घटना सकाळी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच, महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार, या दुर्घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी अनेक मान्यवर आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते, ज्यात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण भिलारे, तहसीलदार सचिन मस्के, सरपंच शिवाजी भिलारे, केंद्रप्रमुख सुरेंद्र भिलारे ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण कृषी सहाय्यक संतोष श्री जगताप संतोष धनावडे पोलीस पाटील रूपाली कांबळे ग्रामस्थ उपस्थित होते तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा समावेश होता.

