पांचगणीभिलार

पाचगणी येथील पारसी पॉईंट येथे दत्त जयंतीनिमित्त सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन!

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाचगणी येथील पारसी पॉईंट येथे दत्त जयंती उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
​दत्त जयंतीनिमित्त, गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.या दिवशी मोठ्या भक्तीभावाने सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात येणार आहे.​पूजेनंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.पारसी पॉईंट दत्त जयंती उत्सव मंडळातर्फे सर्व दत्त भक्तांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा.पारसी पॉईंट, पाचगणी दिनांक: ४ डिसेंबर २०२५, गुरुवारी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे विनम्र आवाहन उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button