भिलार

महाबळेश्वर-पाचगणीत गुलाबी थंडीची दमदार सुरुवात! पर्यटक घेत आहेत मनमुराद आनंद

भिलार प्रतिनिधी
​महाबळेश्वर तालुक्यात पावसाने आता पूर्णपणे विश्रांती घेतल्याने, गुलाबी थंडीने आपले दमदार आगमन केले आहे. निसर्गरम्य पाचगणी आणि महाबळेश्वरच्या वातावरणात सकाळ-संध्याकाळ थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवत असून, यामुळे येणारे पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.
​थंडीची चाहूल लागताच नागरिकांनी व पर्यटकांनी उबदार कपड्यांची तयारी सुरू केली आहे.पाचगणी शहरात विशेषतः भिलार वॉटर फॉल शेजारी जॅकेट्स विकणाऱ्या रस्त्यावरील दुकानांवर अक्षरशः गर्दी जमली आहे. स्वस्त दरात जॅकेट्स रस्त्यावर उपलब्ध असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटक मोठ्या उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.
​गुलाबी थंडी आणि आल्हाददायक हवामान यामुळे सध्या पाचगणी-महाबळेश्वर परिसराचा पर्यटनाचा अनुभव अधिक सुखद झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button