भिलार

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; २० वर्षीय तरुणावर पोक्सो आणि भा.न्या. संहितेनुसार गुन्हा दाखल

पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

भिलार (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील जुने गावठान भिलार येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महेश मंगेश नलावडे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​ दिनांक १५/१०/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
​ महाबळेश्वर तालुक्यातील जुने गावठान भिलार येथील फिर्यादीच्या घराचे अंगणात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये १५/१०/२०२५ रोजी दुपारी ३.००वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
​ पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या घराच्या अंगणात किल्ला बनवत असताना, त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी महेश मंगेश नलावडे (वय २०) याने तिच्याजवळ जाऊन गैरवर्तन केले.​फिर्याद: याप्रकरणी मुलीच्या आई ने पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.​पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपी महेश नलावडे याच्यावर गुन्हा रजि. नं. २५६/२०२५ नुसार खालील कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे:
​भा.न्या. संहिता (BNS) कलम ७४: हे कलम विनयभंग किंवा स्त्रीच्या लज्जाभंगाच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे या गुन्ह्यांशी संबंधित आहे.​पोक्सो अधिनियम २०१२ चे कलम ८: हे कलम ‘लैंगिक हल्ल्यासाठी’ (Sexual Assault) शिक्षा प्रदान करते.​पोक्सो अधिनियम २०१२ चे कलम १२: हे कलम ‘लैंगिक छळासाठी’ (Sexual Harassment) शिक्षा प्रदान करते.​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांना ई-मेलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (वाई विभाग, वाई) यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.जी. पवार  करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button