

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने ‘पद्मश्री डॉ. झहीर काझी रायझिंग स्टार्स फुटबॉल चॅम्पियन्स कप – २०२५’ या दोन दिवसीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २६ शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलताना अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष शौकत अली बेटगेरी म्हणाले की, खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चिकाटी, नेतृत्व आणि सांघिक भावना वाढीस लागते.
या स्पर्धेत विविध गटांमध्ये विजेते आणि उपविजेते संघ खालीलप्रमाणे आहेत:
* १४ वर्षांखालील मुले: संजीवनी विद्यालय, पाचगणी (विजेता) आणि स्कॉलर्स फाउंडेशन स्कूल, पाचगणी (उपविजेता)
* १७ वर्षांखालील मुले: सेंट पीटर्स स्कूल, पाचगणी (विजेता) आणि अंजुमन आय इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाचगणी (उपविजेता)
* १७ वर्षांखालील मुली: ज्ञानगंगा अकादमी, पाचगणी (विजेता) आणि स्कॉलर्स फाउंडेशन स्कूल, पाचगणी (उपविजेता)
* १९ वर्षांखालील मुले: संजीवनी विद्यालय, पाचगणी (विजेता) आणि अंजुमन आय इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाचगणी (उपविजेता)
या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलांमध्ये कु. परानव बर्वे, कोटी लिंगेश्वर आणि हेरंब तावरे यांना तर मुलींमध्ये तैयबा बेपारी हिला सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलकीपर म्हणून मुलांमध्ये ऋषिकेश राठोड, मोहम्मद रहाटविलकर आणि अम्मार बहतिया यांना तर मुलींमध्ये श्रुती सुनील चौधरी हिला गौरवण्यात आले.
या बक्षीस वितरण सोहळ्याला मानदेश चॅम्पियन्सचे संस्थापक प्रभात सिन्हा, अमीर अन्सारी, हमीद कच्ची, अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अफरोज खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका अफरोज खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सादिक शेख यांनी केले, तर अब्दुल कादिर यांनी आभार मानले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षक प्रमोद निकम, रियाज आतार आणि मार्क मेयर यांनी विशेष परिश्रम घेतले.पद्मश्री डॉ. झहीर काझी रायझिंग स्टार्स फुटबॉल चॅम्पियन्स कप – २०२५ पाचगणी येथे जल्लोषात संपन्न

