भिलारमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे भव्य आयोजन


भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
भिलार (ता. महाबळेश्वर) येथे आज ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत भिलार, जिल्हा परिषद केंद्र शाळा भिलार, हिल रेंज माध्यमिक हायस्कूल ,हिल रेंज हायस्कूल भिलार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून संपूर्ण गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली.
या रॅलीत सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच अनिल नाना भिलारे, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन भिलारे, शशिकांत भिलारे, गावातील सामाजिक कार्यकर्ते ग्रामविकास अधिकार राजेंद्र चव्हाण, गावकामगार तलाठी श्री. पवार, पोलीस पाटील रुपाली कांबळे,संतोष कवी ,अनिल बोधे,तानाजी भिलारे,तसेच सर्व शाळांचे शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीदरम्यान राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळकरी मुलांनी हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी गाव दणाणून सोडले.
