मेढा

मी पंचवीस टक्के पक्षाचा अध्यक्ष असलो तरी महाराष्ट्रात शंभर टक्याचा पक्ष बनवेन हा जावलीच्या सुपुत्राचा विश्वास आहे – आ. शशिकांत शिंदे

फडणविस सरकार स्वतःची तिजोरी भरण्यात व्यस्त - आ. रोहीत पवार

मेढा येथिल कलश मंगल कार्यालयात जावलीकरांच्या सत्काराला उत्तर देताना आ. शशिकांत शिंदे व्यासपिठावर आ. रोहीत पवार, माजी आ .सदाशिव भाऊ सपकाळ आदी ( सोमनाथ साखरे 

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले. काही तरी त्या पक्षाच्या अध्यक्षाचे वजन असेल ना. शरद पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष होणे एवढ सोप नाही. कृतत्व बघुनच पद देतात. संघर्षाच्या काळामध्ये जो विश्वार टकलेला आहे जसा छ. शिवरायांच्या काळात आपल्या लोकांवर विश्वास होता. तसे चंदरराव मोरे आज ही आहेत. पराभव पचविण्याची ताकद माझ्यात आहे. मतदार संघ फुटला नसता तर मी राज्यात विक्रमी मताधिक्यांनी विजयी उमेदवार असतो. एवढे प्रेम येथील जनतेने मला दिलेय. आज जे उपस्थित राहीलेत भले मी २५ टक्क्याच्या पक्षाचा अध्यक्ष असो पण हा जावलीचा सुपुत्र १०० टक्याचा राष्ट्रवादी पक्ष केल्याशिवाय राहणार नाही . २०२९ मध्ये परिवर्तन झालेले दिसेल अशी ग्वाही जावलीचा सुपुत्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.मेढा येथे आ. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी आ. शिंदे म्हणाले वरची माझ्याबरोबर नसले तरी चालतील पण खालचे माझ्याबरोबर असतील तर इतिहास घडविण्याची ताकद माझ्यात आहे . वाघ काय ठरविक लोकांनीच व्हावे असे नाही तर आम्हीही वाघ होवु शकतो असे सांगुन माझ्या नेत्याने टाकलेला विश्वास मी सार्थ करेन. अटकेपार झेंडा नेण्यासाठी जावलीच्या सुपुत्राला साथ दया असे आवाहन केले.ते पुढे म्हणाले गरीबाला न्याय राहीला नाही. प्रशासनावर खुप दबाब आहे. परंतु आम्ही दोघे महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि जर कोणी विरोधात आवाज उठविणार पक्ष असेल तर तो फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल असा विश्वास देवुन येणाऱ्या निवडनुकीत पक्षाला साथ द्या जावलीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही .१६ वर्षा नंतरही तुम्ही आजही माझ्यावर एवढे प्रेम आहे तर ती जबाबदारी आता माझी आहे असे सांगीतले.आ. शिंदे पुढे म्हणाले शशिकांत शिंदे आक्रमक आहे हो आहेच वेळ पडली तर रस्त्यावर उतरले विरोधकांना झोडून काढेल. मला साथ द्या. मला माहीत आहे ५० टक्के मला यश मिळणार नाही कारण माझ्या पक्षाची चिंधड्या केल्या आहेत. रोज एक प्रेवश होतोय. यांना विरोधक नको आहे असे सांगुन शरद पवार नसतील तर मुंबई सुद्धा तुमची राहणार नाही. धार्मिक वाद निर्माण केले जाताहेत असे सांगुन आमचा आवाज ऐकल्यानंतर विरोधकांना सुद्धा घाम फुटतो रम्मी खेळणाराला सुद्धा पुढच्या वेळेला रम्मी खेळु का नको असे ठरवितो. सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसा नाही तर मोठी मोठी कॉट्रॅक्ट देण्यासाठी निधी आहे अशी टीका आ. शिंदेंनी केली.यावेळी रोहित पवार म्हणाले की, आजचे राजकारण खूपच खालच्या पातळीवर पोहोचले आहे आणि सत्तेत असलेले लोक फक्त स्वतःची तिजोरी भरण्यात व्यस्त आहेत, त्यांना जनतेची पर्वा नाही. आज राजकारणात पैशाच्या, जातीभेदाच्या आणि हिंदू-मुस्लिमच्या नावावर मते खरेदी केली जात आहेत. महिलांनाही आगाऊ पैसे देण्यात आले आणि त्यांची नावे लाडकी बहन योजनेत जोडण्यात आली आणि आता २४ लाख महिलांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर ही योजना बंद केली जाईल.रोहित पवार यांनी ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित केले आणि देशभरात मशीनमध्ये छेडछाड केल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “नव्या राजकारणात आपल्याला डोळ्यात तेल घालून मशीन मोजाव्या लागतील, तरच आपण जिंकू.”
ते म्हणाले महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित थकबाकीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, सांगलीमध्ये दीड कोटी रुपयांचे काम झाले, परंतु एका वर्षात पैसे मिळाले नाहीत. अलिकडेच पुण्यात दलित समाजातील तीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला.
आ. रोहीत पवार पुढे म्हणाले भाजप खासदार दुबे यांच्या मराठी भाषा आणि संस्कृतीवरील विधानावरूनही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.”फडणवीस साहेब दुबेसाठी लॉबिंग करत आहेत. याचा अर्थ सप्टेंबरमध्ये काहीतरी मोठे घडणार आहे,” असे ते म्हणाले. येत्या तीन महिन्यांत शिंदे गटातील आमदारांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, अन्यथा ते भाजपमध्ये सामील होतील, असे भाकीत रोहित पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले की, २०२९ मध्ये सत्ता सामान्य लोकांकडे म्हणजेच आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही.यावेळी माजी आ. सदाशिव भाऊ सपकाळ, माजी सभापती बापुराव पार्टे आदींनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. फटाक्यांची आतिषबाजी करीत छ शिवाजी महाराज चौकातुन ढोल ताशांच्या गजरात आ. शशिकांत शिंदे, आ. रोहीत पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस राजेंद्र शेलार,जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शफिक शेख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील,विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे, काँग्रेसचे अध्यक्ष संदीप माने, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन गोळे,संतोष चव्हाण,मनसे तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे,अल्पसंख्या सेलचे अध्यक्ष समीर डांगे,राष्ट्रवादी च्या महिला राज्य उपाध्यक्ष समिंद्रा जाधव,राष्ट्रवादी विधानसभा महिला अध्यक्षा राजश्री शिंदे,युवक अध्यक्ष आतिष कदम, विठ्ठल गोळे, सुरेश गायकवाड, योगेश गोळे,राजेंद्र धनवडे, मोहनराव शिंदे,नारायण शिंगटे, विठ्ठल पवार रवी शेलार,चंद्रकांत गवळी,प्रवीण गुजर, बबनराव वारागडे, हेमंत शिंदे,रोहित रोकडे, सचिन जवळ, प्रमोद पवार, प्रकाश कदम, गोपाळ बेलोशे,रामदास पार्टे,विलास दुंदळे,राम कदम,संजय शिंदे,सुंदर भालेराव,किसन जवळ,संकेत पाटील यासह सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उबाठा ) पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी ग्रामस्थ मोठ्या विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक सुरेश पार्टे,यांनी केले तर आभार विठ्ठल गोळे यांनी मांनले. यावेळी सपोनि सुधीर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button