आंब्रळ येथे अतिवृष्टीने घराची भिंत कोसळली..!
आंब्रळ येथील घटना : सततच्या पावसाने घराचे नुकसान.

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)आंब्रळ, तालुका – महाबळेश्वर येथे पडत असलेल्या सततच्या अतिवृष्टीग्रस्त पावसाने शनिवारी संध्याकाळच्या सुमारास श्रीमती विद्या साधू जाधव यांच्या दगड मातीच्या घराची भिंत कोसळली आहे. प्रसंगावधान म्हणून येथे कोणी राहत नसल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घर पडल्याने जाधव कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.महाबळेश्वर तालुक्यात गेल्या अड्डीच महिन्यापासून सतत संततधार पावसाची अतिवृष्टी चालू आहे. याच अतिवृष्टीचा फटका आंब्रळ, (ता- महाबळेश्वर) बसला असून शनिवारी संध्याकाळच्या सुमारास येथील रहिवाशी असलेल्या विद्या साधू जाधव, त्यांचे कुंबळजाई मंदिराजवळील जुने दगडमातीचे बांधकाम असलेले राहत्या घराची भिंत कोसळली आहे.
अगोदरच महसूल कर्मचाऱ्यांनी पाहणी करून त्यांना येथे राहण्यास प्रतिबंध केला होता. त्यामुळे या घरात कोणी राहत नव्हते. म्हणूनच यामध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र अतिवृष्टीचा फटका बसून आर्थिक नुकसान झाले आहे.