गांधीनगर ( मेढा ) येथिल रस्त्यावरून वाहणारे गटरचे पाणी गटरमध्ये वळविताना जेसीबी व नगरपंचायत कर्मचारी (सोमनाथ साखरे)
मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)मेढा नगर पंचायत हद्दीमधील गांधीनगर येथिल गटरचे पाणी रस्त्यावरून वाहुन रस्ते उखलडे जात होते. वाहणाऱ्या पाण्यातुन चिखल, खडी,घाण रस्त्यावर येवुन दुर्गंधी पसरली जात होती. वाहणधारकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागत होता
तर सामान्य माणसांना रस्त्याने चालता येत नव्हते याचा आवाज साप्ताहीक कृष्णकुंज न्युज ने उठवल्याने त्याची दखल मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पराग यांनी घेवुन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील पाणी गटरमध्ये वळविण्यात आले.जनतेच्या अडीअडची बाबत नेहमीच आवाज उठविणाऱ्या साप्ताहीक कृष्णकुंज न्युजचे गांधीनगर रहिवाशांनी आभार मानले. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात येणारी बंदिस्त गटरे निरोपयोगी ठरताना दिसून येत आहेत तर स्वच्छतेचा खेळ खंडोबा होताना जनता पाहत असून नगर पंचायतीने जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी भावना तेथिल रहिवाशी व्यक्त करीत आहेत.
