सातारा लोकसभा मतदार संघात शांततेत मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.1 टक्के मतदान

सातारा (टीम कृष्णकुंज न्युज):- 45- सातारा लोकसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजल्या पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. या मतदान प्रक्रियमध्ये वृद्ध, तरुणांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी 54.1 टक्के मतदान झाले संपूर्ण जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अहोरात्र झोकून प्रयत्न केल्याने व त्यास 45- सातारा लोकसभा मतदार संघातील मतदारांनी चांगली साथ दिल्याने यावर्षी मतदानाची अंतीम आकडेवारीत नक्कीच वाढ झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करताना जिल्ह्यातील मतदारांनी शांततेत, कायदा व सुव्यवस्था राखत मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्वांचे आभार मानले.तालुकानिहाय आकडेवाडी पुढीलप्रमाणे.256 वाई मतदार संघात सायं.5 वाजेपर्यंत 51.9 टक्के, 257-कोरेगाव 57.21, 259-कराड (उत्तर) 54.89, 260-कराड (दक्षिण) 56.99, 261-पाटण 50.3, 262 सातारा 53.55 यंकाळी 5 वाजेपर्यंत टक्के मतदान झाले आहे.


