हिलरेंज एज्युकेशन संस्थेच्या संमेलनातून आनंददायी शनिवार,नवभारत साक्षरता अभियान या विषयावर आधारित नृत्य आणि नाटिकेतून समाजजागृती करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद-राजेश क्षीरसागर

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )
आनंददायी शनिवार, नवभारत साक्षरता अभियान , डिजिटल साक्षरता या विषयावर आधारित विविध कार्यक्रम सादर करून हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी आयोजित केलेले गूंज ऑन अवर कॅम्पस हे स्नेहसंमेलन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले .भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या हिलरेंज हायस्कूल, हिलरेंज माध्यमिक विद्यालय आणि कै. एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी या शाळांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गूंज ऑन अवर कॅम्पस हे स्नेहसंमेलन हिलरेंज हायस्कूल च्या ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर , सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुढारी सातारा आवृतचे वृत्तसंपादक हरिष पाटणे, चित्रपट लेखक, राकेश बक्षी , ग्लोबल पिक्चर्सचे व्यवस्थापक सचिन चव्हाण, यात्री व द लव्हर्स या चित्रपटाचे अभिनेते अनुराग मलहान,पुणे येथील बांधकाम व्यावसायिक निरंजन कटारिया, क्रीम मॅगझीनचे राँनिथ रँडले , हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ.तेजस्विनी जतीन भिलारे, तेजस्विनी नितीन भिलारे, राजेंद्र भिलारे ,गणपत पारठे,
मुख्याध्यापक मुकुंद शिंदे ,किसन भिलारे, सुरेंद्र भिलारे, भाऊसाहेब दानवले आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतगर्गत हिलरेंज च्या तिन्ही शाळांनी उत्तम कार्य सुरू केले आहे,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन ही प्रेरणादायी असतात.आनंददायी शनिवार, नवभारत साक्षरता अभियान , डिजिटल साक्षरता या विषयावर आधारित उपक्रम राबवून,नृत्य आणि नाटिकेतून सादर करून , समाजजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे कौतुकास्पद आहे .
हरिष पाटणे म्हणाले स्व. एम आर भिलारे आणि स्व. बाळासाहेब भिलारे दादा यांनी ग्रामीण भागातील मुले -मुली शिकली पाहिजेत या उद्देशाने सुरू केलेल्या शाळांमध्ये सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडत आहे.त्यांच्या कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. दादांचा वारसा पुढे नितीनदादा, जतीन आणि तेजस्विनी भिलारे चालवीत आहेत हे भूषणावह आहे.
यावेळी बोलताना बक्षी म्हणालेअलीकडच्या काळात शिक्षणाच्या संकल्पना बदलत असताना विद्यार्थांना त्यात सामावून घेण्यासाठी आनंददायी शिक्षण , स्नेहसंमेलन ही काळाची गरज असून ही संकल्पना हिलरेंज राबवण्याचा प्रयत्न करीत आहे हे खरोखरच मुलांना उपयुक्त असेच आहे. यामुळे भावी कलाकार, तंत्रज्ञ, अधिकारी होण्यासाठी मदत होणार आहे.या वेळी विद्यार्थ्यांनी मोबाईल विषय जनजागृती, पर्यावरण जनजागृती ,साक्षरतेचे महत्व सांगणारी , भारतीय संस्कृती, बेटी बचाओ, आदी विषयांवर भाष्य करणारी गीते व नाटिका सादर करण्यात आली .
यावेळी प्रास्ताविक संचालिका डॉ.तेजस्विनी भिलारे यांनी केले. स्वागत नितीन भिलारे आणि जतीन भिलारे यांनी केले.
सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले.
कृतियुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण हा अध्ययन अनुभव देण्यासाठी उभारलेला विविध स्टॉल्स वर विविध पदार्थ खाण्यासाठी पालक व विद्यार्थी तसेच नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
