सेंट पीटर्स स्कूल मध्ये वृक्ष तोड : या झाडांची विनापरवाना वाहतूक करणारावर जावळी वनविभागाची कारवाई
पांचगणी (टीम कृष्णकुंज नेटवर्क) पांचगणी येथील सेंट पीटर्स स्कूल मध्ये तोडलेल्या झाडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या जावळी तालुक्यातील ऐकावर मुद्देमालासह ताब्यात घेत काल उशिरा रात्री वन विभागाने कारवाई केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पांचगणी येथील सेंट पीटर्स हायस्कूल प्रशासनाने आपल्या परिसरात असणाऱ्या धोकादायक झाडांची खडसनेची परवानगी साठी अर्ज केला होता त्यानुसार नुकतीच वाई प्रांताधिकारी यांनी सेंट पीटर्स स्कूल मधील धोकादायक असणाऱ्या १ निलगिरी, २ सिल्व्हर ओक , १ वड, २ आंबा , १ पोलारा आणि २ पिंपरण अशा ऐकून ९ झाडांच्या फांद्या जमिनीपासून निम्म्या उंचीवर खडसनेस/ तोडणेस परवानगी दिली आहे. त्यानुसार त्यांनी काल काम सुरू केले पण या झाडांच्या लांकडाची वाहतूक करणेची परवानगी घेतली नाही. काल सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) मेढा यांनी पाचगणी – कुडाळ – रस्त्यावर मौजे महु गावच्या हद्दीमध्ये विनापरवाना वड प्रजातीच्या अनगड लाकूड मालाची विनापरवाना वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर ट्रॉली क्र. MH-14-B-1921 जप्त करून चालक सूर्यकांत यशवंत सोनवणे (वय 55 वर्षे रा. सोमर्डी, तालुका जावळी) चालक यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2) ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई करताना रायवळ प्रजातीच्या अनगड लाकूडमाला सह जप्त वाहन जप्त करून पुढील तपास कामी वनपरिक्षेत्र कार्यालय मेढा कार्यालयाच्या आवारात सदर वाहन चौकशी कामे जमा केले आहे. या कामी वनरक्षक हुमगाव यांनी प्रथम गुन्हा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा श्रीमती आदिती भारद्वाज व सहा. वनसंरक्षक वनीकरण महाबळेश्वर श्री. प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गणेश महांगडे वनपरिक्षेत्र अधिकारी मेढाअति.कार्यभार श्री. निलेश नि. रजपूत वनपाल बामणोली अतिरिक्त कार्यभार व श्री एस डी चौगुले वनपाल मेढा अतिरिक्त कार्यभार श्री. राहुल धुमाळ वनरक्षक श्री. समाधान वाघमोडे वनरक्षक श्री. आकाश कोळी वनरक्षक श्री. विनायक लांडगे वनरक्षक श्री. नेताजी वासुदेव ,कर्मचारी श्री. पांडुरंग मर्ढेकर श्री. नवनाथ महामुलकर कर्मचारी वर्ग यांनी केली.


