भिलार नागरी वस्तीत आढळला बिबट्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
भिलार तालुका महाबळेश्वर मध्ये काल रात्री बिबट्या आपल्या खाद्याच्या शोधात नागरीवस्तीत आला. जुनी ग्रामपंचायत परिसरात रात्री 3च्या सुमारास नारायण मोरे यांच्या घराच्या शेजारी त्यांचा बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर हल्ला करत कुत्र्याला ओढत नेत असताना कुत्राच्या मोठ मोठा आवाजाने घरातील माणसं जागी झाली असता त्यांना बिबट्या कुत्राला ओढताना दिसून आला. सर्वांनी मोठ मोठा आवाज करून त्याला हुसकून लावले व त्या कुत्राची सुटका केली .यामध्ये कुत्रा जरी किरकोळ जखमी झाला असला तरी आता या परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . अशा परस्थितीत नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चिता करण्यासाठी वनविभागाने त्वरित कारवाई करण्याची आवश्यक आहे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने सर्वत्र धुके व पावसाची रिमझिम चालू असते त्यात असे जंगली हिंसक प्राणी नागरी वस्तीत येत असतील तर हे धोकादायक असल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

