पांचगणी

जुने पोलीस ठाणे ते बस स्थानकापर्यंत पांचगणीची पूर्ण बाजारपेठेत फक्त पर्यटक गाड्या पार्किंग होणार ; नियम मोडणाऱ्यावर कारवाई : सपोनी दिलीप पवार

पांचगणी : (कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )पांचगणी पर्यटन स्थळावर मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगची सोय नसल्याने पर्यटकांची होत असणारी गैरसोय ओळखून आता जुने पोलीस ठाणे ते बस स्थानकापर्यंत पूर्ण मुख्य बाजारपेठ रस्ता हा पर्यटक गाड्या पार्किंग झोन केला असल्याची माहिती पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. पांचगणी शहरात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या भेडसावत असल्याने पांचगणी पोलीस ठाणे, नगरपालिका आणि व्यापारी वर्ग यांची बैठक पांचगणी पालिकेच्या छ्त्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सपोनी दिलीप पवार, पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी बांधवांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला यामध्ये सर्व स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले वाहन बाजारपेठेत अथवा स्वतःच्या दुकानासमोर न लावता पार्कीगकरीता पर्यटकांना जागा ठेवावी.  जेनेकरुन पांचगणी- महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांची पार्कीगची गैरसोय होनार नाही. तसेच सर्व व्यापा-यांनी त्यांची वाहने नगरपालीकेने ठरवुन दिलेल्या पार्कंगमध्येच पार्क करावित. पांचगणी नगरपालीकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले व्यापा-यांचे करीता व पर्यटकांकरीता पे अँड पार्कची व्यवस्था शॉपींग सेंटर व राजलक्ष्मी पार्किंग येथे केलेली आहे. तसेच नगरपालीकेचे पी पार्कंग येथे फ्री पार्कंगची व्यवस्था करणेत आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या एकेरी वाहतुक, पार्कीग व्यवस्थेच्या नियमांचे कडक पालन करणेत यावे. पांचगणी वाहतुक पोलीस, अंमलदार व पांचगणी नगरपालीका यापुढे वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणा-यावर कडक कारवाई करणेसाठी पांचगणी वाहतुक पोलीस अंमलदार व पांचगणी नगरपालीका यांनी कंबर कसली आहे. याला आता पर्यटक, वाहनचालक आणि व्यापारी कसा प्रतिसाद देणार यावरच या नव्या व्यवस्थेचे यश अवलंबून आहे. या बैठकीला व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button