पाचगणी पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (Apगट )यांचे वर्चस्व; पाचगणी नगरपालिकेत जिंकत सत्ता खेचून आणली

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
पाचगणी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल आज जाहीर झाला. या अटीतटीच्या लढतीत माजी नगराध्यक्षा शेखर कासुर्डे यांनी आपल्या नेतृत्वाखालील पॅनेलचे २१पैकी १६ उमेदवार निवडून आणत पालिकेवर पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. एकूण 21 जागांसाठी ७५उमेदवारांनी नशीब आजमावले होते, ज्यामध्ये प्रभागनिहाय चुरशीची लढत पाहायला मिळाली.
निवडणुकीपूर्वी झालेला प्रचाराचा धुरळा आणि स्थानिक आघाड्यांच्या गणितांमध्ये शेखर कासुर्डे यांनी बाजी मारली आहे. एकूण २१ जागांच्या निकालात १६जागांवर विजय मिळवत त्यांनी स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यांच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
या निवडणुकीत विविध प्रभागातून रिंगणात असलेल्या विजय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे:
विजयी उमेदवार…
प्रभाग १
वैभव कऱ्हाडकर २११
राजश्री सणस १८६
प्रभाग २
नरेंद्र बिरामने ४३६
सुप्रिया माने ४५५
प्रभाग ३
आकाश बगाडे ४३१
विमल भिलारे २७०
प्रभाग ४
शेखर कासुर्डे२४८
परवीन मेमन १९८
प्रभाग ५
प्रसाद करंजकर ४९९
शिल्पा माने ३६६
प्रभाग ६
विनोद बिरामणे३७६
माधुरी कासुर्डे३७३
प्रभाग ७
लक्ष्मी कऱ्हाडकर २७४
राजेंद्र पारठे ३३६
प्रभाग ८
अभिलाषा कऱ्हाडकर
अमित कांबळे २७३
प्रभाग ९
स्वाती कांबळे ५०२
प्रकाश गोळे५७५
प्रभाग १०
महेश खांडके ३६४
अमृता गोळे५७१
नगराध्यक्ष पदासाठी दिलीप बगाडे, २६७१
सुनील बगाडे, ९५०
संतोष कांबळे, २६६९ दीपक कांबळे,२८५
सुनील कांबळे,४०६
अमोल सावंत ६६४
,विजय वन्ने , १२६
दास चावरीया ६०
या आठ उमेदवारांमध्ये दिलीप बगाडे
यांनी बाजी मारली पाचगणीचा ‘कारभारी’ होण्याचा मान पटकावला
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
