पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला २४ तासांत अटक

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
शहानगर पाचगणी येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची आणि तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने व वेगाने तपास करत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे पाचगणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विभास बाजीराव सुतार (वय २० वर्षे, रा. वाळणे, पो. अहिर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास शहानगर पाचगणी येथील १६ वर्षे ७ महिने वयाची अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. आरोपी विभास सुतार याने ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही, तिला लग्नाचे आमिष दाखवून पालकांच्या संमतीशिवाय फूस लावून पळवून नेले होते. यानंतर त्याने मुलीला वाळणे येथील आपल्या राहत्या घरात ठेवून, तिच्या इच्छेविरुद्ध आणि संमतीशिवाय वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
मुलीच्या पालकांनी सर्व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने, अखेर मुलीच्या वडिलांनी दि. १४ मे २०२६ रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीवरून पाचगणी पोलिसांत गुन्हा रजि. नं. १०९/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, आणि महाबळेश्वरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने आणि पो. हवालदार श्रीकांत कांबळे (ब.नं. १२८३) यांनी कोणतीही वेळ न दवडता आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण व कौशल्याचा वापर करून शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपी विभास सुतार याला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुटका केली. दि. १५ मे २०२६ रोजी पीडित मुलीने आपल्या पालकांच्या उपस्थितीत सविस्तर जबाब दिला असून, सध्या ती पालकांकडे सुरक्षित आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
पाचगणी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे. या यशस्वी आणि धडाकेबाज कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी पाचगणी पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.भिलार: प्रतिनिधी
पाचगणी येथील एक अल्पवयीन मुलीचे फुस लावून अपहरण करणाऱ्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस एका १६ वर्षे ७ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या संमतीशिवाय फुस लावून पळवून नेण्यात आले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. अखेर याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पाचगणी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने आणि पो. हवालदार श्रीकांत कांबळे यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपी आणि पीडित मुलीचा शोध लावला.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपीने (वय २० वर्ष) पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही, तिला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. तिचे अपहरण करून तिच्या इच्छेविरुद्ध आणि संमतीशिवाय तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. पीडित मुलीने आपल्या पालकांच्या उपस्थितीत पोलिसांसमोर सविस्तर जबाब नोंदवला आहे. सध्या पीडित मुलगी तिच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षित आहे.
पाचगणी पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पाचगणी पोलीस करत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला गजाआड केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी पाचगणी पोलिसांच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच स्थानिक नागरिकांमधूनही पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.


