भिलार

स्ट्रॉबेरी शेतीला पर्यटनाची जोड मिळाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले नितीन (दादा)-स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असो.अध्यक्ष

भिलार(टीम कृष्णकुंज न्यूज)
स्पर्धेच्या युगात शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने आणि निष्ठेने पाहिले पाहिजे . जमिनीची पत सुधारली तर हरितक्रांती होऊन देश सुधारेल .भिलार परिसरातील स्ट्रॉबेरी तिच्यातील गोडव्यामुळे परदेशी बाजारपेठेत टिकून आहे .शेतकऱ्यांनी विषमुक्त आणि सेंद्रिय शेती करणे ही आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा.लि मॅनेजिंग डायरेक्टर जयदेव बर्वे यांनी केले
भिलार येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्ट्रॉबेरी शेतकरी मेळावा, सेंद्रिय शेती मार्गदर्शन व शेतकरी सन्मान सोहळ्यात बर्वे बोलत होते. यावेळी स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असो.अध्यक्ष नितीन दादा भिलारे,कृषिमित्र ॲग्रो इम्पेक्स प्रा.लि.चे संचालक महेश रसाळ ,
श्रीराम फळप्रक्रिया सह. संस्था चेअरमन गणपत पारटे, माजी शिक्षण सभापती सुनिल तात्या काटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश ताटे, विजयराव भिलारे, राजेंद्र भिलारे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे, भाजपच्या महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली भिलारे, प्रवीण म्हस्के, संजय शिंदे, मंगेश साठे, सूर्यकांत पडवळ , सुनील सपकाळ, समृध्दी जाधव, प्रवीण शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीनदादा भिलारे म्हणाले स्ट्रॉबेरी शेतीला पर्यटनाची जोड मिळाल्याने
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे . तरुणांनी आधुनिक पद्धतीने परदेशी बाजारपेठेचा विचार करून शेती करण्याची गरज आहे.
महाबळेश्वर तालुक्यात स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या कल्पकता आणि मार्गदर्शनामुळे तब्बल अडीच ते ३ हजार एकर वर स्ट्रॉबेरी शेती फुलत होती. जिल्ह्यात ५ हजार एकर होती. परंतु त्यांच्या पश्चात ही लागवड कमालीची कमी होत आहे. कदाचित पर्यटन व हॉटेल व्यवसाय, हवामान, नैसर्गिक बदल ही कारणे असली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र आले तरच स्ट्रॉबेरी शेती टिकणार असल्याचे प्रतिपादन कृषिमित्र ॲग्रो इम्पेक्स प्रा.लि.चे संचालक महेश रसाळ यांनी केले.यावेळी जिल्ह्यातील आनंदा विठू भिलारे, गुलाब वाडकर, विश्वनाथ सपकाळ , राघु बीरामने, गणपत पारटे, विठ्ठल दुधाने ,विष्णू मानकुंबरे, संकेत भिलारे, अमोल भिलारे, अर्जुन पारटे, संजय भिलारे, समीर शिंदे, सुभाष भिलारे, विष्णू मानकुंबरे, अर्जुन वाडकर, वसंत पारटे, दत्तात्रय भिलारे, दत्तात्रय गावडे, कुमार बावळेकर, कुमार बावळेकर, उमेश खामकर, रुपेश रांजणे, अरविंद दानवले, उमेश बामणे, ऋषिकेश बिरामणे, संजय इंगवले ,सुदेश बावळेकर, दिनेश भिलारे ,विठ्ठल शिंदे, अमर भोसले ,मंगेश सरकाळे यांना स्ट्रॉबेरी लागवड व उत्पादन या मध्ये विविध विभागात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी समृद्धी जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर उमेश रसाळ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button