
मेढा (टीम कृष्णकुंज नेटवर्क)बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्याने काही महिने समाजमन सुन्न झाला होता. अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपींचे फोटो व व्हिडीवो पहायल्या नंतर प्रत्येकाचे रक्त उसळल्या शिवाय रहात नाही. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांनी ज्या अमानुष पध्दतीने छळ करून हत्या केली आहे याचा निषेध करण्यासाठी व या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी समस्त जावळीकरांच्या वतीने बुधवार दि.५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वेण्णाचौक मेढा ते तहसिलदार कार्यालय मेढा असा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असून सर्वांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांनी केले आहे.