मेढा

जेवणाच्या कारणावरून पतीकडून पत्नीचा खून

मेरुलिंग येथिल घटणा, आरोपीस अटक

मेरुलिंग (नरफदेव ) येथिल खुनाच्या संशयित आरोपीसह सपोनि प्रथ्वीराज पाटील, श्रीमती आश्विनी पाटील सह पोलीस कर्मचारी

मेढा (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क) – जावली तालुक्यातील ओझरे येथिल रहिवाशी असलेली सपना गौतम चव्हाण ही माहेरी मेरुलिंग (नरफदेव ) ता. जावली येथे रहावयास गेली असताना जेवन बनविनेचे कारणावरून पतीकडून झालेल्या मारहाणीत उपाचारा दरम्यान ( दि. १३ रोजी ) मृत्यु झाल्याने पती गौतम शिवाजी चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.याबाबात देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, वरील पती व पत्नी हे दोघेही ओझरे ता. जावली येथिल रहिवाशी असून सध्या ते मेरुलिंग ( नरफदेव ) येथे रहावयास होते. जेवणाचे कारणावरून दोघा पतीपत्नीमध्ये भांडण झाल्याने पती गौतम शिवाजी चव्हाण याने चिडून जावून हाताने लाथाबुक्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केलेली होती. त्यानंतर सदर महिलेस औषधउपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे अँडमिट केले असता उपचारा दरम्यान सपना चव्हाण हिचा मृत्यु झाला. दरम्यान याबाबतची तक्रार मयत सपनाचा भाऊ याने पोलीस ठाण्यात दिली. सदर खुनाचे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस प्रमुख श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचिम यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करणेकामी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी पथक तयार करून गोपनिय बातमादार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपीस चोवीस तासात अटक केली. सपोनि पृथ्वीराज ताटे सह स.पो. फौ. विकास गंगावणे, पोशि. सनी काळे, अभिजीत वाघमळे, सुरज वाघमळे, चालक पो.हवा. विजय माळी, पो.ना. बाळकृष्ण नष्टे, जिवीशा विभागाचे पो.ना. रमेश चव्हाण यांनी सहभाग घेतला असून रजि. नं.१९०/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करणेत आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्रीमती आश्विनी पाटील ह्या करीत आहेत. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button