मेढासातारा

आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी तर तुम्ही ठेकेदारांना जगवण्यासाठी पक्ष बदलले का ? अमित कदमांचा सवाल

    मेढा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना सदाशिव सपकाळ, सुरेश पार्टे तसेच अमित कदम आदी मान्यवर ( सोमनाथ साखरे )

मेढा (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)- मी राजकीय सत्तेचा किती लाभार्थी आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष बदलतो पण तुम्ही कशासाठी पक्ष बदलले ठेकेदारांना जगवण्यासाठी ना? राजकीय सत्तेत आम्ही तुम्हाला कसेही नाचवु शकतो अशांच्या विरोधात आमची बंडखोरी कायम राहील. ठेकेदार, कोणीकडून मिळालेला लाभार्थी, एकादे मिळालेले काम अथवा अडचणीत आणलेला माणूस अशा प्रकारची माणसे यांचे कार्यकर्ते आहेत यात सामान्य माणूस म्हणून कार्यकर्ता नाही अशा शब्दात सातारा जावलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी टिका केली.मेढा येथे महाविकास आघाडी निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश पार्टे , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप माने, शिवसेना ( उबाठा गट ) चे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, जेष्ट नेते नारायण शिंगटे, साधु चिकणे, प्रकाश कदम, सचिन जवळ, विठ्ठलराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम  यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची संस्कृती बिघडविल्याचा आरोप करून जाती धर्मातील माणसाला माणसात राहुन द्यायचा नाही असा विकृत मनोवृतीचा माणूस राज्याच राजकारण करतो आहे असा घणाघात कदम यांनी केला. कदम पुढे म्हणाले राष्ट्रवादी (शरद पवार ) , कॉग्रेस, शिवसेना (उबाठा ) आणि इतर पक्ष हे सगळे एकत्र येताहेत ते काय राजकीय फायद्यासाठी नाही तर महायुतीच्या हातात सत्ता गेली तर जात जातीत , पक्ष पक्षात, भाऊ भावात राहणार नाही आणि येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही अस सांगीतले. माझे वडील जीजी आण्णा , सदाभाऊ , शशिकांत शिंदे यांनी जावलीच पालकत्व केले. कोणत्याही कामासाठी गेले तरी ते जनतेला भेटत होते परंतु आत्ताचे पालकत्व करणारे जनता त्यांच्याकडे जाताच कपाळावर आट्या पाडतात अन मतांची आकडेवारी पुढ्यात ठेवली जाते अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदरवार अमित कदम यांनी करीत मशाल चिन्हाचे बटण दाबुन निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी लोकप्रतिनिधी २० टक्के, ठेकेदार २० टक्के आणि अधिकारी २० टक्के कमीशन खातात तर ४० टक्क्यात काम होणार कस अशी टीका करीत दोन दोन महिन्यात रस्ते खराब होतात अन पुल वाहुन जातात म्हणजे विकास कसला असा प्रश्न उपस्थित करत ठेकेदारांना पोसल जात असल्याचा आरोप सदाशिव सपकाळ यांनी केला.यावेळी सुरेश पार्टे, संदिप माने आणि संतोष चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व स्वागत साधु चिकणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button