गणेशोत्सवात मेढा नगर पंचायतीची बत्ती गुल एसटी डेपो परिसारात अंधार , गणेश भक्त नाराज
मेढा नगरपंचायत हद्दीमधील सातारा महाबळेश्वर रोडवरील बंद पडलेल्या गणेशत्सव काळातील स्टेट लाईट ( सोमनाथ साखरे )
मेढा (टीम कृष्णकुंज नेटवर्क) मेढा नगरीत गणेश उत्सव मोठया भक्तीमय वातावरणात साजरा केला जात असताना मेढा शहरातील काही भाग मात्र गत तीन दिवस झाले अंधारात बुडाला जात आहे. रात्री गणेशाच्या दर्शनासाठी बाहेर पडणारे गणेश भक्त नगर पंचायतीच्या बत्ती गुल मुळे नाराज झाले आहेत.मेढयामध्ये तसेच जवळवाडी येथे सार्वजनिक मंडळांतर्फे मोठया भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात असताना सायंकाळी परिसरातील पुरुष, महिला , मुली गणेशाच्या दर्शनासाठी , देखावे पाहण्यासाठी तसेच गणेशाच्या आरतीसाठी येत आहेत. या वेळी जेष्ठ नागरिक ही घराबाहेर पडत असतात.मोठया भक्तीमय आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असताना मेढा नगरीच्या सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील एसटी डेपो रोडवरील स्टेट लाईट मात्र गत तिन दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात स्टेट लाईट बंद असल्याने लोकांच्यात नाराजी पसरली आहे. नगर पंचायतीमध्ये काम करणारे कर्मचारी हे साधारण नगरपंचायत हाद्दीमधील रहीवासी असूनसुद्धा गणेशत्सव काळात लाईट बाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. एसटी डेपो येथिल परिसरातील रोडवरील स्टेट लाईट बंद असलेबाबत कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता उद्या सुरु केली जाईल असे सांगण्यात आले असले तरी गत तीन दिवस स्टेट लाईट बंद आहे याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न सामान्य नागरीकाला पडला आहे. नगर पंचायतीने स्टेट लाईट सुरू ठेवाव्यात अशी माफक उपेक्षा व्यक्त करीत आहेत.