पांचगणीभिलार

दानवलीच्या गणेश दानवले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी निवड.!#krishnakunj news#

पाचगणी : (टीम कृष्णकुंज न्यूज)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी दानवली, तालुका महाबळेश्वर येथील गणेश बंडू दानवले यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाअध्यक्ष श्रीयुत शरद पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले असून या निवडीबद्दल महाबळेश्वर तालुक्यात शरद पवार समर्थकांनी यांचे अभिनंदन केलं आहे ..
गणेश दानवले यांस जिल्हा सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व अन्य मान्यवर लोणंद, येथे कार्यक्रमात हे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष श्रीयुत शरद पवार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. असून त्यांच्या खांद्यावर सातारा जिल्ह्याची सरचिटणीस पदाची धुरा टाकण्यात आली आहे.

गणेश दानवले यांच्या सरचिटणीस पदी निवडीने महाबळेश्वर तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये बळ आले आहे..!!

यावेळी व्यासपीठावर शरद पवार गटाचे. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा अध्यक्ष सुनील माने,व राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते आणि महाबळेश्वर तालुक्यातील युवक तसेच दानवली ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते गणेश दानवले यांच्या निवडीबाबत सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी आपले मनोदय व्यक्त करताना नूतन सरचिटणीस गणेश दानवले म्हणाले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यत पोहचवून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असून पक्षाची ध्येय धोरणे लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button