आषाढी वारीत नंदकुमार घाडगे यांच्याकडून वारकऱ्यांना औषधाचे वाटप

खंडाळा (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिवसेना ठाकरे गटाचे संघटक नंदकुमार घाडगे यांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे मुक्कामी आहे.वारीच्या वाटेवर शनिवारी जिल्ह्यात पहिला मुक्काम दिवस होता.यावेळी माऊलींचा जयघोष अन् ठिक ठिकाणी भजन,किर्तनाने परिसर माऊलीमय झाला आहे.या पायीवारीमध्ये लाखो वारकरी सहभागी झाले आहेत.वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणुन शिवसेना उध्दव ठाकरे पक्षांकडून वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी आषाढी वारीमध्ये लोणंद येथे आरोग्य तपासणी औषधाचे वारकऱ्यांना वाटप तालुका प्रमुख सागर कदम,शिवसैनिकांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी डॉ.डि.बी.बामणे यांचे सहकार्य लाभले.वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी पायीवारीमध्ये असणाऱ्या वारकऱ्यांना पाण्याचा टॅकर देणे असो अथवा औषध वाटप करून त्यांची काळजी घेतली.सर्व वारकऱ्यांची वारी चांगली घडावी,अशा सदिच्छा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी व्यक्त केली.खंडाळा (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिवसेना ठाकरे गटाचे संघटक नंदकुमार घाडगे यांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे मुक्कामी आहे.वारीच्या वाटेवर शनिवारी जिल्ह्यात पहिला मुक्काम दिवस होता.यावेळी माऊलींचा जयघोष अन् ठिक ठिकाणी भजन,किर्तनाने परिसर माऊलीमय झाला आहे.
या पायीवारीमध्ये लाखो वारकरी सहभागी झाले आहेत.वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणुन शिवसेना उध्दव ठाकरे पक्षांकडून वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी आषाढी वारीमध्ये लोणंद येथे आरोग्य तपासणी औषधाचे वारकऱ्यांना वाटप तालुका प्रमुख सागर कदम,शिवसैनिकांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी डॉ.डि.बी.बामणे यांचे सहकार्य लाभले.वाई विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे यांनी पायीवारीमध्ये असणाऱ्या वारकऱ्यांना पाण्याचा टॅकर देणे असो अथवा औषध वाटप करून त्यांची काळजी घेतली.सर्व वारकऱ्यांची वारी चांगली घडावी,अशा सदिच्छा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी व्यक्त केली.
