स्विफ्ट कार व दुचाकीची भिषण धडक आंबेघर येथील अपघातात एकाचा जागीच तर दुसरा दुसरा गंभीर जखमी



आंबेघर तर्फ मेढा गावचे हद्दीमध्ये मेढा केळघर रोडवर पलटी झालेली स्विफ्ट कार व दुचाकी वाहन व मृत पावलेला प्रविण कासुर्डेआंबेघर तर्फ मेढा गावचे हद्दीमध्ये मेढा केळघर रोडवर पलटी झालेली स्विफ्ट कार व दुचाकी वाहन व मृत पावलेला प्रविण कासुर्डे
मेढा (कृष्णकुंज न्युज नेटवर्क )आंबेघर तर्फ मेढा येथील हद्दीमध्ये मेढा केघळर रोडवर स्विफ्ट कारने एका दुचाकी वाहनास धडक दिल्याने वरोशी ता. जावली येथिल प्रविण कोडींबा कासुर्डे (वय ४०) याचा जागीच मृत्यु झाला तर सिद्धांत संतोष कदम ( वय १७ ) हा गंभीर जखमी अपघाताच्या नोंदी संदर्भात मेढा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता संबंधीत ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वरिष्टांचा संदर्भ देवुन माहिती देण्यास नकार दिला. अपघाताबाबत घटणा स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वरोशी गावचे युवक प्रविण कोडींबा कासुर्डे (वय ४०) हे आपल्या लुना टीव्हीएस (क्रमांक एम एस – ११ Y ५२८३) वरून दूध घालण्यासाठी मेढा येथे चालले होते. त्यांची गाडी आंबेघर तर्फ मेढा गावच्या बस स्टॉपच्या पुढील बाजूस आली असताना अचानक महाबळेश्वरकडे जाणाऱ्या स्विफ्ट (क्रमांक एम एच ४३ एल – ३७५० ) या कारने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की यावेळी दुचाकीवरील प्रविण कोंडीबा कासुर्डे (वय ४० ) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला सिद्धांत संतोष कदम (वय १७ वर्षे) हा इ १२ वीत शिकणारा युवक गंभीर जखमी झाला आहे. तो मेढा येथे कॉलेजला चालला होता. प्रविण कासुर्डे हा शेती व दुग्ध व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद मेढा पोलीस स्टेशनला उशिरा झाली असून अधिक तपास सा.पो.नि संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बेचके हे करत आहेत.
वरोशी (ता. जावळी) एक युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे जावळी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.