भिलार

हिलरेंज विद्यालयात नवागतांचे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

भिलार (टीम कृष्णकुंज)भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलामहाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने नव्याने प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, ते शाळेत यावेत याकरिता प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या, हिलरेंज माध्यमिक विद्यालयात नवागतांचे स्वागत ढोल – लेझीम च्या गजरात , पुष्प व पेन देऊन करण्यात आले यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे , संचालिका आणि कै. एम.आर. भिलारे हायस्कूल राजपुरीच्या मुख्याध्यापिका डॉ. तेजस्विनी भिलारे,संचालिका सौ. तेजस्विनी नितीन भिलारे  उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहीजेत या उद्देशाने स्व. बाळासाहेब भिलारे दादांनी शाळेची स्थापन केली. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी  विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन  डॉ तेजस्विनी भिलारे यांनी केले हिलरेंज माध्यमिक विद्यालयात गुरेघर, भोसे, पांगारी, तायघाट, उंबरी, दानवली, घोटेघर, आखेगणी, कासवंड, गोळेवाडी, भिलार या गावातील नव्याने प्रवेश घेतलेल्या १०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.  या विद्यार्थ्यांचे   स्वागत ढोल- लेझीमच्या गजरात, पुष्प व एक पेन देऊन मोठ्या उत्साहात  स्वागत करण्यात आले .यावेळी वर्ग सजावट आणि विद्यार्थी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांनी केले सूत्रसंचालन संगीता खरात यांनी केले तर आभार विनायक बगाडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी विनायक बगाडे , कल्पेश गायकवाड, शांताराम जाधव, राजू मोरे, संगीता खरात, सुजाता पारठे, आनंदा बर्गे , संतोष मालुसरे यांनी परीश्रम घेतले.भिलार (टीम कृष्णकुंज)
भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, ते शाळेत यावेत याकरिता प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या, हिलरेंज माध्यमिक विद्यालयात नवागतांचे स्वागत ढोल – लेझीम च्या गजरात , पुष्प व पेन देऊन करण्यात आले यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे , संचालिका आणि कै. एम.आर. भिलारे हायस्कूल राजपुरीच्या मुख्याध्यापिका डॉ. तेजस्विनी भिलारे,
संचालिका सौ. तेजस्विनी नितीन भिलारे उपस्थित होते.ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहीजेत या उद्देशाने स्व. बाळासाहेब भिलारे दादांनी शाळेची स्थापन केली. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन डॉ तेजस्विनी भिलारे यांनी केले
हिलरेंज माध्यमिक विद्यालयात गुरेघर, भोसे, पांगारी, तायघाट, उंबरी, दानवली, घोटेघर, आखेगणी, कासवंड, गोळेवाडी, भिलार या गावातील नव्याने प्रवेश घेतलेल्या १०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल- लेझीमच्या गजरात, पुष्प व एक पेन देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .यावेळी वर्ग सजावट आणि विद्यार्थी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांनी केले सूत्रसंचालन संगीता खरात यांनी केले तर आभार विनायक बगाडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विनायक बगाडे , कल्पेश गायकवाड, शांताराम जाधव, राजू मोरे, संगीता खरात, सुजाता पारठे, आनंदा बर्गे , संतोष मालुसरे यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button