मेढा

कावडीच्या रोहिणी मानकुमरे हीची सातारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहायक पदी निवड…

जावली तालुक्यातील कावडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कवडी गावच्या कन्येची उतूंग भरारी..

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)कावडी, तालुका जावळी गावाची सुकन्या कु. रोहिणी साहेबराव मानकुमरे हिची नुकत्याच  लागलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रिया निकालात सातारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक पदी निवड झाली. तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे…!रोहिणी मानकुमरे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत  यश संपादन केले. असून  लहान वयात डोक्यावरील आई वडीलांचे छत्र हरपले. त्यांच्या पश्चात आजी व  चुलता चुलतीनी खूप चांगल्या पद्धीतीने रोहिनीचे संगोपन करीत आई वडिलांचे प्रेम दिले तसेच  शैक्षणिक दृष्ट्या परीपुर्ण केले. त्यानंतर रोहिनीला स्पर्धा परीक्षांची तयारी करायला खूप पाठबळ दिले. रोहिणीचे प्राथमिक  शिक्षण जिल्हा परिषद शाळा कावडी, तर माध्यमिक शिक्षण हातगेघर एन. एन. शहा हायस्कूल येथेच झाले. यापुढील उच्च शिक्षण कॉमर्स मधून पदवी पर्यंतचे नवी मुंबई  येथे पूर्ण केले आहे.फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये जिल्हा परिषदे करिता सरळ सेवा भरती प्रक्रिये अंतर्गत अनेक पदांकरिता  स्पर्धा परीक्षा पार पडल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये रोहिणी मानकुमरे  हिने उतुंग यश संपादन केले आहे.. 

जावळी तालुक्यातील बरीच मुले आजकाल स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करत यश मिळवत आहेत. त्यात कावडीची रोहिणी हीची देखील यामध्ये  भर पडली. तसेच आपली मुलगी सरकारी नोकरीत लागली त्यामूळे घरात एकूणच आनंदाचे वातावरण आहे. सहा गाव पंचक्रोशीत तिचे अभिनंदन होत आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button