स्व. बाळासाहेब भिलारे यांचे स्ट्रॅाबेरी संशोधन केद्राचे स्वप्न पुर्तीचे बांधकामाला सुरवात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून पहील्या टप्प्यात ४० लाखाचा निधी

- भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज) : महाबळेश्वर तालुक्याचे प्रमुख पीक म्हणून स्ट्रॉबेरीकडे पाहिले जाते. जागतिक दर्जावर पोहोचलेल्या या पिकाचे महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र व्हावे ही इच्छा स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे माजी अध्यक्ष कै. बाळासाहेब भिलारे यांची होती. हे केंद्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुर करून बाळासाहेब भिलारे यांचं स्वप्न सत्यात उतरवून साकार केले आहे.
सध्या या मंजूर स्ट्रॅाबेरी संशोधन केद्राचे काम प्रगती पथावर असुन. महाबळेश्वर तालुक्यातील महत्वाचे पीक म्हणुन ओळख असलेल्या स्ट्रॅाबेरी पीकावर संशोधन करण्याकरीता महत्वपुर्ण पाऊल मानले जात आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतुन साकारलेले शेतक-याच्या स्ट्रॅाबेरी पीकाकरीता प्रमुख केद्र आहे .
गतवर्षी राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या ३१ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या २०२२ साली झालेल्या बैठकीमध्ये मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
सदर प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथे पुढील पाच आर्थिक वर्षात राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे. या प्रकल्पास राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रु.३४३.६३ लाख निधी पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने रू.३४३.६३ लाख नियतवाटप मंजूर करण्यास मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार संचालक (संशोधन), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे .
सदर संशोधन केद्राच्या इमारतीचा बांधकाम खर्च २ कोटी ३१ लाख असुन लागवडीचा खर्च व संशोधनाचा ७९ लक्ष असुन. कृषी अवजारे करीता ४० लक्ष रुपये खर्च येणार आहे .
महाराष्ट्रातील तसेच बहुतांशी महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख फळ म्हणून स्ट्रॉबेरीकडे पाहिले जाते. या पिकावरच तालुक्याचे जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी फळ प्रक्रीया संशोधन केंद्राची गरज होती ती मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्याने आता स्ट्रॉबेरी उत्पादन क्षेत्रात महाबळेश्वर तालुक्यात क्रांती होणार असल्याची भावना स्ट्रॉबेरी तज्ञ किसंनशेठ भिलारे यांनी व्यक्त केली.
————————
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्ट्रॅाबेरी संशोधन केद्राला निधी उपलब्ध केल्याने आता बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र तालुक्यात उभे राहणार आहे. हे केंद्र तालुक्याचे वैभव ठरणार असून यामुळे शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी उत्पादन घेण्यासाठी आणखी गती आणि आधुनिकता येणार आहे.
राजेंद्र शेठ राजपूरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक———————————-
या केंद्रासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. हे केंद्र व्हावे ही इच्छा ही बाळासाहेब भिलारे यांची होती. मुख्यमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक विचार करून आमच्या तालुक्याला न्याय दिला आहे.
प्रवीण शेठ भिलारे , शेतकरी
