जावलीतील मुले यशाची शिखरे गाठत आहेत – विष्णू धनावडे
पदोन्नती मिळाल्याने वर्गमित्रांनी केला सन्मान

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) जावली तालुक्यातील मुले स्पर्धा परिक्षांसाठी पुढे येत आहेत आणि त्यांना यश सुद्धा मिळत आहे. मंत्रालय असो कि आयुक्त, जिल्हाधिकारी अशा वेगवेगळ्या पदांवर विराजमान होत असताना देशसेवे साठीही अनेक तरुण सहभागी झाले आहेत. हळुहळु का होईना पण तालुक्यातील मुले परिश्रम घेण्याच्या तयारीत असल्याने यशाची शिखरे गाठत असल्याचे सहाय्यक आयुक्त विष्णु धनावडे यांनी सांगितले.
वाशी ( नवी मुंबई ) येथे आपला वर्ग मित्र सहाय्यक आयुक्त पदावर पोहचल्याने आनंदीत झालेल्या सर्व मित्रांनी विष्णु धनावडे ( रा. मामुर्डी ) तसेच सौ वृषाली अक्षय पार्टे ( रा. गोंदेमाळ ) हिची मुंबई येथे कामगार आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाल्या बद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी भरत धनावडे, चंद्रकांत सपकाळ , गणपत भिलारे, वसंत पार्टे, दत्ता धनावडे , सुर्यकांत धनावडे, हणमंत धनावडे, मंदाकिनी मर्ढेकर आदी मित्र उपस्थित होते.