सामाजिक बांधिलकी आणि आई प्रती आपुलकीची भावना म्हणून आईसाठी एक झाड लावून त्याची जोपासना करावी – नितीनदादा भिलारे


भिलार (टीम कृष्णकुंज न्युज)पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून त्याची जोपासना करण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी आणि आई प्रती आपली आपुलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे . त्यासाठी राबविण्यात आलेली ‘आईसाठी एक झाड ‘ ही योजना यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष व हिलंरेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन(दादा) भिलारे यांनी केले. ग्रामपंचायत भिलार आणि हिलंरेज एज्युकेशन सोसायटी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक झाड,आपल्या आईसाठी या योजनेचा शुभारंभ हिलंरेज माध्यमिक विद्यालय भिलार येथे करण्यात आला.यावेळी भिलारे बोलत होते.यावेळी हिलंरेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे, तेजस्विनी नितीन भिलारे, भिलार सरपंच शिवाजी भिलारे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे उपस्थित होते.यावेळी हिलंरेज संकुलातील शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे आठशे झाडे वाटप करण्यात आली.वाटप करण्यात आलेली झाडे विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात लावायची असून ती जगवायची आहेत.यासाठी शिक्षकांची मार्गदर्शनाखाली त्यांची जोपासना करावी असे आवाहन सरपंच शिवाजी भिलारे यांनी केले.डॉ.तेजस्विनी भिलारे म्हणाल्या निसर्ग हा आपला गुरू आहे .निसर्ग आपल्यात आनंद आणि जगण्याची नवी उमेद निर्माण करतो त्यासाठी झाडे लावणे हा एकमेव पर्याय आहे .यावेळी संगीता खरात, विनायक बगाडे, सुजाता पारठे, राजू मोरे, शांताराम जाधव, कल्पेश गायकवाड, आनंदा बर्गे ,संतोष मालुसरे,अली सर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

