सह सचिव वैभव राजे घाडगे यांची भिलार येथे सदिच्छा भेट; महिलांच्या व्यावसायिक जिद्दीचे केले कौतुक


भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)भिलार (ता. महाबळेश्वर):
पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या भिलार येथे मुख्यमंत्री सचिवालयाचे सह सचिव मा. वैभव राजे घाडगे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्ते विनायक भिलारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.या भेटीदरम्यान घाडगे साहेब यांनी घरातील महिलांशी संवाद साधत त्यांच्याशी आस्थेने विचारपूस केली. महिलांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीला पूरक जोडधंदा करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि ‘महिला सबलीकरणा’त योगदान द्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
भेटीत एक महत्त्वाची बाब समोर आली की, भिलारे यांच्या घरातील महिलांनी ‘वेलवेट पेन्सिल’ तयार करण्याचा जोडधंदा सुरू केला होता. मात्र, योग्य मार्केटिंग आणि बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळे हा व्यवसाय सध्या बंद करावा लागला. घाडगे साहेब यांनी या तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या आणि ग्रामीण भागातील उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळणे किती गरजेचे आहे, यावर चर्चा केली.
यावेळी विनायक भिलारे यांच्या वतीने घाडगे साहेब यांना महाबळेश्वरची प्रसिद्ध आणि रसाळ स्ट्रॉबेरी भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते,
तानाजी भिलारे (जिल्हा उपाध्यक्ष),विनायक भिलारे,सागर भिलारे,प्रकाश भिलारे
यांसह परिसरातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.