

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) पाचगणी या शैक्षणिक केंद्रात शिक्षण घेण्यासाठी देशभरातून येणारी विद्यार्थ्यांची भावी पिढी अमली पदार्थांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळा प्रशासन आणि स्थानिक व्यावसायिकांनी गंभीरतेने घ्यावी, अन्यथा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिला.
‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात ‘नशामुक्त पाचगणी’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या अनुषंगाने पोलिस ठाण्याच्या सभागृहात शहरातील सर्व शाळांचे प्रतिनिधी आणि बाजारपेठेतील व्यावसायिकांची बैठक पार पडली.
पोलिसांचा स्पष्ट इशारा
सपोनी पवार यांनी सांगितले की, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे, तक्रार पेटी उपलब्ध करणे, तसेच शाळेबाहेर टवाळखोर व रोडरोमियोंच्या हालचाली पोलिसांपर्यंत पोहोचवणे या गोष्टी अनिवार्य आहेत.तसेच, पान टपरी आणि बिअर शॉपी व्यावसायिकांनी १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोणतेही नशिल्या पदार्थांचे पेय किंवा सिगारेट, गुटखा यांसारखी उत्पादने विकू नयेत, अन्यथा दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
महत्त्वाचे निर्णय व उपक्रम
सीसीटीव्ही निरीक्षण: प्रत्येक शाळा परिसरात सीसीटीव्ही लावून किमान दोन महिन्यांचा व्हिडीओ बॅकअप ठेवणे अनिवार्य.शालेय तपासणी: विद्यार्थ्यांच्या बॅग्सची वेळोवेळी तपासणी आणि बाजारातून येणाऱ्या लोकांची नियमित छाननी.जनजागृती: शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, तसेच शहरात रॅली व इतर कार्यक्रमांद्वारे अमली पदार्थांविरोधात जनजागृती केली जाणार.
🔴 अठरा वर्षाखालील विद्यार्थी पान टपरीवर आढळल्यास
🔴 विद्यार्थ्यांना अमली पदार्थांची विक्री केल्यास
👉 संबंधित व्यावसायिकांवर गुन्हा दाखल होईल आणि त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा सपोनी पवार यांनी दिला.
या बैठकीला पाचगणीतील सुमारे ३५ शाळांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी व शहरातील व्यापारी उपस्थित होते.
पोलिसांच्या सूचना (थोडक्यात):
शाळेत नशा करणारे पदार्थ येणार नाहीत याची दक्षता घ्या .विद्यार्थ्यांच्या साहित्याची नियमित तपासणी करा.शाळा परिसरात सीसीटीव्ही लावा.कर्मचाऱ्यांची व बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची पारख करा . कोणती ही शंका आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा शिक्षक व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष द्यावे
