मेढा

आपली वर्तणूक चांगली असेल तर चांगलेच घडते – प्रा . संध्या चौगुले

डॉ. संपतराव कांबळे यांना मानाचा " जीवन गौरव पुरस्कार " प्रदान

डॉ. संपतराव कांबळे यांना “जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना , संध्या चौगुले व मान्यवर.

डॉ. संपतराव कांबळे यांना मानाचा ” जीवन गौरव पुरस्कार ” प्रदान
मेढा (टीम कृष्णकुंज न्युज)
“आजच्या परिवर्तनशील काळात युवक युवतींनी शिक्षणाबरोबरच विविध प्रकारची जीवन कौशल्य प्राप्त करून आपली प्रगती साधली पाहिजे. तसेच महिलांनी पारंपरिक अंधश्रद्धांचा त्याग करून व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ बनवावे” आपली वर्तणूक चांगली असेल तर चांगलेच घडते असे सुचित करून मं. गांधी वाचनालयाचे काम उत्तम असून ही संस्था समाज घडविण्याचे काम करत आहे. असे गौरवद्गार हिरवाई संस्थेच्या प्रा. संध्या चौगुले यांनी काढले.
म. गांधी वाचनालय मेढा यांचे वतीने संस्थेच्या विजयाताई थत्ते सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. संध्या चौगुले, डॉ. अक्षया कुलकर्णी,सोमनाथ काशिलकर, सुर्यकांत देशमुख, विनय थत्ते , शुभांगी थत्ते ,प्रा तुकाराम ओंबळे, शिवाजीराव देशमुख, यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी ,संचालक, सल्लागार व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये ८मार्च जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन १७ मार्च रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा. संध्या चौगुले ह्यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ. अक्षया कुलकर्णी यांनी महिलांचे आहार व आरोग्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सोमनाथ काशिलकर ,सुर्यकांत देशमुख, प्रा .तुकाराम ओंबळे, जयश्री शेलार, कु. निलम पवार यांनी आपल्या मनोगतातून वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी उपस्थीत मान्यवरांचे शुभहस्ते सन २०२३ -२४ सालच्या विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये संस्थेचा मानाचा “जीवन गौरव पुरस्कार “मेढयाचे माजी सरपंच डॉ . संपतराव कांबळे यांना तर स्व. सावित्री सिताराम थत्ते ” आदर्श महिला वाचक पुरस्कार -सौ. वंदना प्रशांत गरव, सौ. रेखा संजय वांगडे, कु. निलम संजय पवार यांना तर सुरेश पार्टे पुरस्कृत स्व .जनाबाई मारूती पार्टे “आदर्श माता पुरस्कार “सौ अनिता युवराज सुर्यवंशी, प्रा. तुकाराम ओंबळे पुरस्कृत स्व . प्रा.मंदाकिनी तुकाराम ओंबळे “जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार ” सौ.जयश्री रविंद्र शेलार, स्व. मंदाकिनी तुकाराम ओंबळे “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार “सौ.मनिषा शंकर रामुगडे उंब्रज जि. प. मुलींची शाळा उंब्रज यांना , डॉ. एस. आर. रंगनाथन “जिल्हास्तरी आदर्श ग्रंथपाल पुरस्कार ” संजय रामचंद्र शिंदे नगर वाचनालय कराड, स्व .शामराव बापुराव क्षिरसागर गुरुजी ” जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार “लक्ष्मण शिवाजी बने-काढणे ता पाटण, इत्यादींना वरील पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले .
याच कार्यक्रमात विविध स्पर्धा परिक्षांमधून मेढा नगरीतील यशस्वी झालेल्या.अक्षय रमेश खताळ ( सहकार सहाय्यक अधिकारी पुणे आयुक्तालय), प्राची ज्ञानेश्वर संकपाळ ( सहाय्यक पोलीस निरीक्षक), नितीन चंद्रकांत चिंचकर(सहाय्यक प्रबंधक आर .बी. आय .बँक),रेश्मा भाऊसाहेब बेलोटे ( बी एड पदवीधर शिक्षिका) ,उमेश युवराज सुर्यवंशी ,शाहरुख बशीर खान ( वहातुक निरीक्षक) ,जावेद मुबारक शेख ( भुमि अभिलेख भु माफक अधिकारी) व सौ.पल्लवी निखिल खताळ( समुदाय आरोग्य अधिकारी ), सौ. प्रियांका श्रीराम किरवे ( आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त )
यांचा सत्कार सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांचे शुभहस्ते सरस्वती पुजन, म. गांधी प्रतिमेचे, व एस. आर . रंगनाथन प्रतिमेचे पुजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष नारायण शिंगटे, सुत्रसंचलन सुरेश पार्टे यांनी तर आभार प्रियांका किरवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयाचे सचिव धनंजय पवार, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभा शेडगे, स्वाती दिक्षीत, प्रकाश परांजपे, गणेश खताळ ,अशोक दिक्षीत, शशिकांत कदम , रघुनाथ जवळ, ग्रंथपाल आशा मगरे व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

●सोमनाथ काशिलकर व सुर्यकांत देशमुख यांनी त्यांच्यावतीने पुढील वर्षापासून दोन नवीन पुरस्काराची घोषणा केली.

● डॉ. संपतराव कांबळे यांनी आपला जीवन गौरव पुरस्कार गुरु स्व डॉ.थत्ते यांच्या चरणी अपर्ण केला.

●डॉ. संपतराव कांबळे यांनी ११, १११ / – रुपये देणगीचा चेक देण्यात आला.

● सुर्यकांत देशमुख यांनी हजारो रुपयांची पुस्तके वाचनालयास भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button