भिलार

भिलारच्या पठारावर विविध फुलांनी बहरलेले

 

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)भिलार पुस्तकाच्या गाव तालुका महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून असलेल्या महाबळेश्वर पाचगणी जवळच असणाऱ्या निसर्गरम्य पुस्तकाचे गाव असणाऱ्या पठाराव सुमारे चारशे एकरच्या विस्तारित पठारावर रंगबिरंगी फुलांनी बहरलेले आहे .सध्या या पठारावर चाहूर ,निळलवंती, मिकी माऊस , गेंद, उदिचिराईत, तेरडा, सोनकी,अशा सप्तरंगी फुलांची मुक्त उधळण झाल्याची दिसून येत आहे. फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होत आहे. या फुलांचे वैभव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने याठिकाणी पर्यटक भेटी देत असून या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी फळे प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचे जीव येथे आढळून येतात. निसर्गरम्य अद्भुत ठेवा असलेले निसर्गाचा अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेटी देत आहेत सध्या स्थितीत पाचगणी परिसरातील डोंगर पठारावरची विविध रानफुले भरू लागले. पठाराच्या पूर्व दिशेस स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य सैनिक यांचे काही काळ वास्तव असलेले गुहा टायगर केव असे नैसर्गिक गुफा या ठिकाणी पाहण्यास मिळतात या पठाराची पाहणी करताना वन क्षेत्रपाल एच. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुरेघर वन परीमंडळ अधिकारी आर व्ही काकडे वनरक्षक बी एस जावीर वनशिपाई संजय भिलारे, साहेबराव पारठे,सरपंच शिवाजी भिलारे , नितीनदादा भिलारे, प्रवीण भिलारे,शिवाजी भिलारे, सचिन भिलारे ,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
याठिकाणी अनेक  जातींच्या विविध रंगांची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत .या निसर्ग सौंदरचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी भेटी देऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत आहेत पर्यटकांनी याठिकाणी विविध फुलांचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायती भिलार यांच्याकडून आव्हान करण्यात येत आहे.

नितीनदादा भिलारे (सामाजिक कार्यकर्ते)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button